टेस्लामध्ये काम करायचंय? मग लक्ष द्या! एलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीनं आता भारतात, विशेषतः मुंबई, पुणे, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या शहरांत भरती सुरू केली आहे. टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अशा दोन्ही प्रकारच्या जागांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.
कोट्यवधी पगार, परदेशात जाण्याची संधी, आरोग्य विमा, स्टॉक ऑप्शन्स – हे सगळं एका नोकरीत! ग्राहक सेवा, विक्री, अभियांत्रिकी, AI, IT, चार्जिंग आणि रोबोटिक्स क्षेत्रात भरती होणार आहे.
एंट्री-लेव्हलवर ३-१४ लाख, मिड-लेव्हलवर ६-२० लाख, आणि सीनिअर लेव्हलवर ३० ते ६० लाखांपर्यंत पगार! शिवाय पुण्यात अॅप्लिकेशन सपोर्ट आणि व्हॉइस इंजिनिअरसारख्या पोस्टसुद्धा रिकाम्या आहेत.
इच्छुक उमेदवारांनी टेस्लाच्या वेबसाइटवर जाऊन पात्रता आणि भरतीबाबतची सगळी माहिती तपासावी. START इंटरनशिप प्रोग्रॅमद्वारे फ्रेशर्सनाही मोठी संधी उपलब्ध आहे.