पुणे-मुंबई भागातील शिक्षकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आलीय! राज्यातल्या खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधल्या जवळपास 49,562 शिक्षकांना आणि 2,714 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता वेतनाच्या पुढील टप्प्याचं अनुदान मिळणार आहे.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. हे अनुदान 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असून, यासाठी सरकारला दरवर्षी ₹970.42 कोटींचा खर्च होणार आहे.
शिक्षकांनी मागील काही महिन्यांपासून आंदोलन केलं होतं, त्याला अखेर यश मिळालं. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असून, हा निर्णय राज्यातील 6,075 शाळा आणि 9,631 तुकड्यांवर लागू होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील ही पावलं म्हणजे शिक्षकांसाठी खरं तर एक मोठं आर्थिक समर्थन ठरणार आहे.