शिक्षकांची मागणी – रिक्त पदे!-Teachers’ Demands – Vacancies!

Teachers’ Demands – Vacancies!

0

जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक), नांदेड शाखेने केली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

Teachers’ Demands – Vacancies!शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना प्रत्यक्ष भेटून एकूण १६ प्रकारच्या मागण्या असलेले निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदोन्नत मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक आणि विषय शिक्षकांच्या पदांची तातडीने भरती व्हावी. जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या, पण अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पदोन्नती नंतर समायोजन केले जावे.

इयत्ता सहावी ते आठवीमध्ये अध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांना २०१९ पासून प्रलंबित असलेली वेतनश्रेणी दिली जावी. सलग १२ वर्षे व २४ वर्षे एकाच पदावर कार्यरत शिक्षकांना चटोपाध्याय आणि वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी. भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रातील त्रुटी दुरुस्त करून विवरणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंता बैस, माध्यमिक शिक्षक संघटनेचे एम.ए. खदीर, बळवंत मंगनाळे, बालाजी पांपटवार, रवी ढगे, संजय मोरे, रमेश ईटलोड, हणमंत काऊलवार, संजय गंजगुडे, विठ्ठल मुखेडकर आदींचा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.