महाराष्ट्रातील खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना अखेर मोठा दिलासा मिळालाय. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल १७ समित्यांची संख्या आता फक्त ५ वर आणण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय.
या पावलामुळे शाळा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होणार असून शिक्षकांचा अनावश्यक कागदोपत्री कामांचा बोजा हलका होणार आहे.
आता फक्त या ५ समित्या अनिवार्य असतील –
शाळा व्यवस्थापन समिती
सखी सल्लागार समिती
महिला तक्रार निवारण/आंतरिक तक्रार समिती
विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती
शाळा समिती
यामुळे वारंवार होणाऱ्या बैठका, इतिवृत्त लेखन आणि जास्तीच्या कागदोपत्री प्रक्रियेत कपात होईल. परिणामी, शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळून शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केलाय.

Comments are closed.