शिक्षक भरतीचा ताबा परीक्षा परिषदेकडे!-Teacher Recruitment Shifted to MSCE!

Teacher Recruitment Shifted to MSCE!

राज्यातील शिक्षक पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे (MSCE) सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत ‘पवित्र पोर्टल’द्वारे ही भरती केली जात होती.

Teacher Recruitment Shifted to MSCE!मात्र, टीईटी परीक्षांमधील गैरप्रकार, अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिक्षक भरती ही दीर्घकालीन आणि वेळखाऊ प्रक्रिया असल्याने शिक्षण आयुक्त कार्यालयावर अतिरिक्त ताण पडत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा (TET), अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तसेच निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असावी, या उद्देशाने परीक्षा परिषदेकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.

मात्र, परीक्षा परिषदेमार्फत पूर्वी झालेल्या टीईटी परीक्षांमधील गैरप्रकार लक्षात घेता, ही प्रक्रिया कितपत पारदर्शक राहील, असा सवाल पात्रताधारक उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, भविष्यातील भरती प्रक्रियेबाबत चर्चा आणि शंका दोन्ही वाढताना दिसत आहेत.

Comments are closed.