राज्यात शिक्षक भरतीसाठी उत्सुक असलेल्या लाखो उमेदवारांसाठी ही मोठी निराशाजनक बातमी आहे. पटसंख्येच्या नव्या निकषांनुसार माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 20,000 हून अधिक शिक्षक अतिरिक्त झाले असून पुढील पाच वर्षे कोणतीही नवीन शिक्षक भरती होण्याची शक्यता नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाने सुधारित संचमान्यता आदेश जारी केला. त्यानुसार विद्यार्थीसंख्येप्रमाणे शिक्षकांचे प्रमाण निश्चित झाले आणि नव्या निकषांनुसार राज्यभरातील शिक्षक अतिरिक्त ठरले. उच्च न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्यामुळे हा निर्णय अंमलात आला आहे.
दरवर्षी टीईटी परीक्षेला २.५ ते ३ लाख उमेदवार बसतात; तर इयत्ता ९वी ते १२वी शिक्षकांसाठी ‘टेट’ आवश्यक आहे. मात्र शिक्षक अतिरिक्त असल्याने टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 4–5 वर्षे भरतीची प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सद्यस्थिती
- एकूण शाळा: 17,265
- कार्यरत शिक्षक: 1,70,000
- एकूण विद्यार्थी: 90 लाख
- अतिरिक्त शिक्षक: 8,600
प्राथमिक, जिल्हा परिषद, महापालिका व खासगी शाळांमध्ये मिळून अतिरिक्त शिक्षक: 15,000+
समायोजन प्रक्रिया कशी होणार?
- जिल्ह्याच्या आत – सेवाज्येष्ठतेनुसार समायोजन
- विभाग स्तरावर समायोजन
- राज्यभरातील रिक्त पदांवर अंतिम समायोजन
- इयत्ता 10-12 व 9वीपर्यंतच्या परीक्षा संपल्यावर, म्हणजे 1 एप्रिल ते 15 जून 2026 दरम्यान प्रक्रिया पूर्ण होणार
संचमान्यतेच्या दोन वर्षांतील समायोजन पूर्ण झाल्यावरच राज्यातील एकूण रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल, असे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.

Comments are closed.