राज्यात शिक्षकांचे समायोजन वादात! हजारो शिक्षकांमध्ये भीतीची लाट! | Teacher Adjustment Sparks Statewide Panic!

Teacher Adjustment Sparks Statewide Panic!

राज्यात २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षण विभागाने आता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या अचानक आलेल्या परिपत्रकामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयावर जोरदार टीका करत “हे परिपत्रक म्हणजे शिक्षकांच्या डोक्यावरची टांगती तलवार” असल्याचे म्हटले आहे.

Teacher Adjustment Sparks Statewide Panic!

अतिरिक्त शिक्षकांची नेमकी संख्या अजून निश्चितच नसल्याने प्रक्रिया गोंधळात अडकली आहे. किती शिक्षकांचे समायोजन होणार? कोणत्या शाळांमध्ये पाठवले जाणार? याबाबत स्पष्टता नसल्यामुळे संपूर्ण समायोजन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिवाय, अनेक शिक्षकांना अचानक आपल्या मूळ शाळेतून दूरच्या ठिकाणी बदलीचा सामना करावा लागू शकतो.

शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ च्या परिपत्रकाचा आधार घेत समायोजन प्रक्रिया २०२४-२५ मध्ये राबवण्याचे आदेश दिले आहेत. पण न्यायालयीन निर्णयाचे कारण अजून स्पष्ट नसताना इतक्या घाईत परिपत्रक का काढले, असा सवाल संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. कमी पटसंख्येच्या शाळांवर बंदीची कुऱ्हाड कोसळेल आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर विपरित परिणाम होईल, अशीही भीती शिक्षक संघटना व्यक्त करत आहेत.

यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. अतिरिक्त शिक्षक इतर शाळांमध्ये वळवल्याने नवीन भरतीची गरजच उरणार नाही, अशी प्रतिक्रिया तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
शिक्षक संघटनांचे मत असे की,
“अतिरिक्त शिक्षकांचा तपशील, स्थानांतराचे निकष आणि प्रक्रियेतील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ही प्रक्रिया तातडीने थांबवावी.” – महाराष्ट्र शिक्षक परिषद

राज्यातील शिक्षण व्यवस्थेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.

Comments are closed.