६ वर्षांनंतर दिलासा!विद्यापीठात शिक्षक भरती!-Teacher Hiring Cleared After 6 Years!

Teacher Hiring Cleared After 6 Years!

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मधील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १३ शिक्षक पदांच्या भरतीस शासनाने मंजुरी दिली असून, त्यासाठी लवकरच निवड प्रक्रिया सुरू होणार आहे.

Teacher Hiring Cleared After 6 Years!विद्यापीठात एकूण १११ शिक्षक पदे मंजूर असून, प्रत्यक्षात सध्या ६७ शिक्षक कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांसाठी आणखी शिक्षकांची तातडीची गरज असतानाही २०१९ मध्ये पाठवलेला प्रस्ताव कोरोना काळ, आरक्षणविषयक अडचणी आणि प्रशासकीय कारणांमुळे रखडला होता. अखेर ११ फेब्रुवारी रोजी शासनाने जीआर जारी करत १३ पदांच्या भरतीला हिरवा कंदील दिला.

या मंजूर पदांमध्ये ३ सहायक आणि १० सहयोगी प्राध्यापक पदांचा समावेश आहे. भरतीसाठी नवीन गुणांकन पद्धत लागू करण्यात आली असून ६० गुण विषयज्ञानासाठी, २० गुण कौशल्यासाठी आणि २० गुण मुलाखतीसाठी असतील. अर्जांची छाननी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, विद्यापीठाने ३१ शिक्षक पदांसाठी नव्याने प्रस्ताव पाठवला असला तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही तीव्र कमतरता असून, येत्या काळात मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.