शिक्षक पात्रता निकाल जाहीर !-Teacher Eligibility Result Aug 18!

Teacher Eligibility Result Aug 18!

महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ चा निकाल १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील तब्बल २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे.

Teacher Eligibility Result Aug 18!ज्यांनी आपले व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र वेळेवर सादर केले आहे, त्यांचेच निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. ज्यांनी ‘अॅपीअर’ म्हणून अर्ज केला होता, त्यांना प्रमाणपत्र लवकर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, नाहीतर त्यांचे निकाल जाहीर केले जाणार नाहीत.

उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर लॉगिन करुन निकाल पाहता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध असेल.

परीक्षेस २७ मे ते ३० मे आणि २ जून दरम्यान घेतली गेली होती. या परीक्षेस एकूण २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेस उपस्थित होते.

ज्यांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांचे निकाल राखीव ठेवले जातील आणि प्रमाणपत्र सादर केल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

Comments are closed.