शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी दुसऱ्यांदा मुदतवाढ केली आहे. आता सर्व मुख्याध्यापकांना २० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रूजू अहवाल आणि शालार्थ आयडी आदेश शासनाला अपलोड करणे आवश्यक आहे.
याआधी नागपूर येथे बोगस शालार्थ आयडी वापरून कोट्यवधी रुपयांचा पगार घेण्याचा प्रकार समोर आला होता. अशाच प्रकारची दुरुस्ती इतर जिल्ह्यांमध्येही झाली असावी, असा संशय व्यक्त झाला. त्यामुळे राज्य शासनाने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंलडंवार यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमली आहे.
सुरवातीला या कागदपत्रे ३१ ऑगस्टपर्यंत, नंतर १५ सप्टेंबरपर्यंत अपलोड करण्याची मुदत होती, आता ती २० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांनी मुदतवाढीत सर्व मुख्याध्यापकांनी वेळेत कागदपत्रे अपलोड होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २१० शाळांमधील ३,००० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेली नाहीत.

Comments are closed.