राज्यातील रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या, म्हणजेच तलाठ्यांच्या १७०० पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.

यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबरअखेर आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
२०२३ सालच्या तलाठी भरती परीक्षांमध्ये काही गैरप्रकार आणि नियुक्ती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे राज्यातील १३ जिल्ह्यांत समस्या निर्माण झाल्या होत्या.
न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा करत शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना ११ महिन्यांसाठी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील नियुक्तीबाबत निर्णय होईल.

Comments are closed.