राज्यांत गेल्या दोन-तीन वर्षांत तलाठी पदांची भरती ठप्प झाली होती, पण आता तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी १७०० जागा लवकरच भरायच्या आहेत. केवळ वित्त खात्याची मान्यता मिळाली की भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
मात्र, आदेश कधी येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. राज्यात २०२३ मध्ये मेगा तलाठी भरती झाली होती, ज्यात ४७९३ जागा होत्या. त्यातील ४२१२ उमेदवारांना नियुक्तीची नोटीस मिळाली आणि ३८५० उमेदवारांनी पदभार स्वीकारला.
त्यामुळे ९४२ जागा रिक्त राहिल्या आणि त्याचबरोबर अजून ७५७ पदं रिक्त आहेत. एकूण १७०० पदं भरायची बाकी आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रक्रियेची माहिती लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
ही भरती लवकरच होणार असल्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे. २०२३ मधल्या भरतीत काही गैरव्यवस्थांमुळे आणि पैसा मागितल्यामुळे भरती वादग्रस्त ठरली होती. तीन वर्षे तलाठी भरती बंद असल्यामुळे गावांतील कामं थांबलेली आहेत. आता लवकरच ही समस्या सुटेल अशी अपेक्षा आहे.

Comments are closed.