विद्यार्थी सहाय्यता केंद्रांना लवकरच प्रमुख!-Student Help Centres to Get Heads!

Student Help Centres to Get Heads!

राज्यातील सीईटी प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी व विद्यार्थीकेंद्री करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ४० जिल्हास्तरीय विद्यार्थी सहाय्यता केंद्रांवर केंद्रप्रमुखांची नियुक्ती लवकरच होणार आहे.

Student Help Centres to Get Heads!यासाठी सीईटी कक्षाकडून नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या असून, राज्यभरातून सुमारे ११० उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी २५ ते ३० जिल्ह्यांसाठी उमेदवार निश्चित झाले असून त्यांना लवकरच नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.

मात्र काही जिल्ह्यांसाठी एकही अर्ज न आल्याने किंवा उमेदवारांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास नकार दिल्याने, तेथील केंद्रप्रमुखांची जबाबदारी कंत्राटदार कंपनीकडे देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यंदा ३६ जिल्ह्यांत ४० केंद्रे कार्यान्वित होणार असून, प्रत्येक केंद्रात प्रवेश मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवा दिल्या जातील.

निवड झालेल्या केंद्रप्रमुखांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार असून, केंद्र चालवण्यासंबंधी सर्व माहिती दिली जाईल. उर्वरित कर्मचारी खासगी कंपनीमार्फत नियुक्त होणार असल्याने, सर्व केंद्रे पूर्णवेळ आणि अद्ययावत सुविधांसह कार्यरत राहतील, असा विश्वास सीईटी कक्षाने व्यक्त केला आहे.

Comments are closed.