शाळांत हेड काऊंट धडाक्यात!-Student Headcount Drive Begins!

Student Headcount Drive Begins!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हेड काऊंट पडताळणी सुरू झाली आहे. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार यासाठी तब्बल १६५ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके शाळांना अचानक भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या तपासत आहेत.

 Student Headcount Drive Begins!राज्यस्तरावर लवकरच एकाच दिवशी सर्व शाळांची विद्यार्थी उपस्थिती तपासली जाणार आहे. याआधी केंद्रप्रमुख स्तरावरून विद्यार्थ्यांची वास्तविक संख्या खात्रीने तपासण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील पथके सध्या यू-डायसवरील नोंदी, सतत गैरहजर विद्यार्थी आणि प्रत्यक्ष उपस्थिती यांची पडताळणी करत आहेत.

2025-26 वर्षापासून संचमान्यता यू-डायस प्लस प्रणालीत मुख्याध्यापकांनी भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीवर आधारित राहणार आहे. मात्र या डेटामध्ये चुकीची किंवा जादा संख्या टाकली गेल्याची शक्यता पाहता, आता प्रत्यक्ष तपासणीद्वारे सत्यता पडताळली जात आहे.

पडताळणी गुप्तपणे सुरू

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या तपासणीबाबत गोपनीयता ठेवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक पथकात एक केंद्रप्रमुख आणि दोन कर्मचारी आहेत. ग्रामीण भागात तपासणी सुरू झाली असून महापालिका क्षेत्रातही दोन दिवसांत सुरू होणार आहे.

शिक्षकांच्या पदांवर परिणाम?

शाळांतील विद्यार्थी संख्येवरूनच शिक्षकांची पदसंख्या ठरते. काही ठिकाणी पदे कमी होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखवली जात असल्याचे उदाहरणे आढळली आहेत. आता आधार-प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष उपस्थिती तपासली जात असल्याने शिक्षक पदांवर बदल होण्याची शक्यता वाढली आहे.

२४०० पेक्षा जास्त शाळांमध्ये तपासणी

जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या 2,090 शाळा आणि 295 अनुदानित शाळा — एकूण सुमारे 2,400 शाळांमध्ये दोन लाख विद्यार्थी. या सर्व ठिकाणी पथके भेट देणार आहेत.

Comments are closed.