राज्यस्तरीय परीक्षा पुढे ढकलल्या!-State Medical Exam Postponed!

State Medical Exam Postponed!

राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या अती मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय वैद्यकीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.

State Medical Exam Postponed!विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अत्यंत अवघड ठरत असल्याने, सर्व परीक्षार्थींचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाच्या सूचनेनुसार, २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, आणि सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासत राहावी.

याच संदर्भात, एमपीएससी परीक्षा देखील पुढे ढकलण्याची मागणी झाली आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे सध्या शक्य नाही, त्यामुळे परिस्थिती स्थिर झाल्यावरच परीक्षा घेणे सुज्ञ निर्णय ठरेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

Comments are closed.