एसएससीची नवी स्कोअर पद्धत!-SSC’s New Score Method!

SSC’s New Score Method!

0

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने आपल्या भरती परीक्षांसाठी स्कोअर नॉर्मलायझेशन पद्धतीत बदल केला आहे. आतापर्यंत उमेदवारांचा गुणफलक सामान्य करण्यासाठी SSC टॉप स्कोअर, सरासरी स्कोअर आणि प्रत्येक शिफ्टमधील गुणांचं वैविध्य यांचा विचार करत असे.

SSC’s New Score Method!ह्या पद्धतीतून उमेदवारांना एक “ऍडजस्टेड स्कोअर” मिळत असे, ज्यामुळे अवघड शिफ्टमध्ये बसलेल्या उमेदवारांना तोटा होत नसे आणि सोप्या शिफ्टमधील उमेदवारांना अन्याय्य फायदा मिळत नसे.

SSCच्या परीक्षांमध्ये लाखो उमेदवार बसतात आणि त्या विविध शिफ्टमध्ये घेतल्या जातात. प्रत्येक शिफ्टचा अवघडपणा सारखा नसतो, त्यामुळे तुलनात्मक न्याय मिळावा म्हणून नॉर्मलायझेशनची गरज निर्माण होते. आतापर्यंतची पद्धत प्रभावी होती, पण तिचं मूल्यमापन केल्यानंतर आयोगाने आणखी अचूक आणि न्याय्य प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

आता SSCनं इक्वीपरसेंटाईल पद्धत लागू केली आहे. या पद्धतीत उमेदवाराचा परफॉर्मन्स थेट त्याच्या शिफ्टमधील रँकिंग किंवा पर्सेंटाईल स्कोअरवर आधारित असतो. म्हणजेच एखाद्या उमेदवाराने आपल्या शिफ्टमध्ये किती चांगला परफॉर्म केला हे महत्त्वाचं ठरतं. नंतर त्याच पर्सेंटाईल स्कोअरच्या आधारावर सर्व उमेदवारांचं एकत्रित मूल्यमापन केलं जातं.

२ जून २०२५ रोजीच्या नोटिसमधून SSCनं ही नवी पद्धत जाहीर केली आहे. यामुळे आता अवघड किंवा सोप्या शिफ्टचा फरक उमेदवारांच्या निकालावर परिणाम करणार नाही. सर्व उमेदवारांना एकाच स्तरावर समान व न्याय्य वागणूक मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.