सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अभियंत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) १३४० कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.
ही भरती सिव्हिल, मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखांसाठी असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू असून, अंतिम तारीख २१ जुलै २०२५ आहे. इच्छुकांनी ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा.
अर्ज करताना सर्वप्रथम नोंदणी (Registration) करावी लागेल. त्यानंतर लॉगिन करून फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी आणि फॉर्म सबमिट करून प्रिंट घ्यावा. अर्ज शुल्क ₹१०० आहे, मात्र महिला, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे. पात्रतेच्या दृष्टीने उमेदवारांकडे संबंधित शाखेतील B.E./B.Tech पदवी किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
परीक्षा दोन टप्प्यांत होईल – पेपर १ (ऑब्जेक्टिव्ह) आणि पेपर २ (डिस्क्रिप्टिव्ह). ही भरती केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये होणार असून, उत्तीर्ण उमेदवारांना ₹35,400 – ₹1,12,400 या वेतनश्रेणीत नोकरी मिळेल. ही एक स्थिर, प्रतिष्ठित आणि आकर्षक संधी असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब करू नये.