स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत जीडी कॉन्स्टेबलच्या तब्बल २५,४८७ पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी रोजगारसंधी आहे. सर्व पदे जनरल ड्युटी (GD Constable) अंतर्गत भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.

उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक असून एससी/एसटीला 5 वर्षे, तर ओबीसीला 3 वर्षे वयात सूट आहे. अर्ज शुल्क जनरल आणि ओबीसीसाठी 100 रुपये असून महिला, एससी आणि एसटी उमेदवारांना फी लागू नाही. भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून निवड झाल्यास उमेदवारांना ₹21,700 ते ₹69,100 एवढा पगार मिळेल.
सविस्तर माहिती SSCच्या अधिकृत https://ssc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भरतीचे विभाग व पदे :
- BSF – 616
- CISF – 14,595
- CRPF – 5,490
- SSB – 1,764
- ITBP – 1,293
- Assam Rifles – 1,706
- SSF – 23
आरक्षणानुसार पदांचे विहंगावलोकनही प्रसिद्ध करण्यात आले असून सर्व दलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. बेरोजगार तरुणांसाठी ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठ्या संधींपैकी एक ठरू शकते.

Comments are closed.