दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२६ संदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. आता परीक्षा अर्ज परीक्षा सुरू होण्याच्या २० दिवस आधीच बंद करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे अर्ज प्रक्रियेला ठरावीक मर्यादा आली असून, शाळा-मंडळाच्या नियोजनाला मदत होणार आहे.
राज्य मंडळाच्या निर्णयानुसार बारावीचे अर्ज २१ जानेवारीपर्यंत, तर दहावीचे अर्ज ३० जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. याआधी, परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा होती. मात्र आता ती पद्धत बदलण्यात आली आहे.
फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले असून, अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच ही मोठी सुधारणा करण्यात आली आहे. उशिरा अर्ज करणाऱ्यांसाठी अतिविलंब, विशेष अतिविलंब व अतिविशेष अतिविलंब शुल्क यांची स्पष्ट रुपरेषाही मंडळाने जाहीर केली आहे.
विविध विभागीय मंडळांकडून आलेल्या मागण्यांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांची अचूक संख्या ठरवताना अडचणी येत होत्या. त्यामुळे परीक्षा केंद्रांचे नियोजन अधिक सोपे व पारदर्शक होण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

Comments are closed.