मोठी अपडेट: 10वी–12वी परीक्षांबाबत गैरसमज दूर, राज्य मंडळाची अधिकृत माहिती जाहीर! | SSC HSC Exams: Board Issues Clarification!

SSC HSC Exams: Board Issues Clarification!

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची दखल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली असून, अधिकृत व अचूक माहिती देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.

SSC HSC Exams: Board Issues Clarification!

याच उद्देशाने विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी ‘एमबीएसएसई (MBSSSE)’ हे अधिकृत मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून, MSBSHSE चे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स या माध्यमांतूनच परीक्षांबाबतची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

फेब्रुवारी–मार्च 2026 मधील परीक्षांदरम्यान सर्व महत्त्वाच्या सूचना याच माध्यमांतून दिल्या जातील, असे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी व सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आता थेट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावे लागणार असून, यासाठी Maker–Checker प्रणाली लागू करण्यात आली आहे.

शिक्षक/शाळा गुण नोंदवतील तर मुख्याध्यापक/प्राचार्य तपासणी करतील. या ऑनलाइन प्रणालीमुळे काम शाळा पातळीवरच पूर्ण होऊन मंडळावरील ताण कमी होईल, निकाल लवकर लागतील आणि चुकांची शक्यता कमी होईल. जाहीर वेळापत्रकानुसार 12वी (HSC) परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे 2026 आणि 10वी (SSC) परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2026 दरम्यान होणार आहेत.

दहावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून नियमित शुल्कासह अर्ज 15 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरदरम्यान फक्त शाळांमार्फत स्वीकारले जातील. शाळांनी ‘School Profile’ अद्ययावत ठेवणे, प्री-लिस्ट पडताळणी, आवश्यक स्वाक्षऱ्या व शिक्के आणि UDISE Plus मधील नोंदी अचूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे; त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ राज्य मंडळाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.