दहावीची फेब्रुवारी-मार्च २०२६ ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाने अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे. १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान नियमित शुल्कासह ऑनलाइनच अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया केवळ शाळांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमित विद्यार्थ्यांची माहिती ‘यूडायस प्लस’ मधील पेनआयडीवरून शाळाप्रमुख अर्ज भरतील. मात्र पुनर्परीक्षार्थी, खासगी उमेदवार, आयटीआय विद्यार्थी व श्रेणीसुधार घेणाऱ्यांचे अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन भरता येतील.
शाळांनी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’मध्ये सर्व माहिती अचूक टाकणे बंधनकारक आहे. प्री-लिस्ट छापून विद्यार्थ्यांनी व मुख्याध्यापकांनी सही करून पडताळणी करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्काचा भरणा आरटीजीएस/एनईएफटीनेच करावा लागणार असून पावती व यादी ठरलेल्या तारखेत सादर करणे गरजेचे आहे.

Comments are closed.