दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सशस्त्र सीमा बल (SSB) अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, कॉन्स्टेबल ट्रेड्समन आणि ड्रायव्हर पदांसाठी तब्बल ८२७ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी २० एप्रिल २०२६ पर्यंत ssb.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा. या भरतीमध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर ५५३, व्हेटरनरी ३४, गार्डनर ४१, वॉटर कॅरियर ५, मोची २५, टेलर ४१, धोबी ७४, न्हावी ४३, वेटर ३, बढई ७ आणि नर्सिंग ऑर्डरली १ अशी विविध पदे भरली जाणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक असून नेपाळ व भूतानमधील काही उमेदवारांनाही विशिष्ट पदांसाठी संधी देण्यात आली आहे. अर्जदाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर काही पदांसाठी संबंधित कौशल्य किंवा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा साधारणपणे १८ ते २३ किंवा १८ ते २७ वर्षे असून पदानुसार ती बदलू शकते. अर्ज शुल्क सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १०० रुपये आहे, तर एससी, एसटी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज मोफत ठेवण्यात आला आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम ssb.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Constable Tradesman/Driver Apply” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर ईमेल व मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून लॉगिन करावे, अर्जाचा फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा. शेवटी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवावी.

Comments are closed.