NIPER मध्ये SRF फेलोशिपची संधी!-SRF Fellowship Open at NIPER!

SRF Fellowship Open at NIPER!

NIPER रायबरेली येथे ANRF प्रोजेक्ट अंतर्गत सीनियर रिसर्च फेलो (SRF) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. फार्मा, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही उत्तम संशोधनाची संधी आहे.

SRF Fellowship Open at NIPER!या पदासाठी M.Sc./M.Tech किंवा संबंधित शाखेतील किमान 60% गुणांसह पदवी आवश्यक असून, किमान 2 वर्षांचा रिसर्च अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच GPAT/GATE/NET पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹42,000 + HRA वेतन दिले जाईल. सुरुवातीला एक वर्षासाठी नियुक्ती असून, कामगिरीनुसार ती 3 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.

इच्छुक उमेदवारांनी 3 एप्रिल 2026 पूर्वी ईमेलद्वारे अर्ज करावा. ऑनलाइन मुलाखत 8 एप्रिल 2026 रोजी होणार असून, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे माहिती दिली जाईल.

Comments are closed.