JSS फार्मसीमध्ये SRF फेलोशिप!-SRF Fellowship at JSS Pharmacy!

SRF Fellowship at JSS Pharmacy!

तमिळनाडूतील JSS College of Pharmacy, ऊटी येथे फार्मा आणि लाइफ सायन्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी Senior Research Fellow (SRF) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

SRF Fellowship at JSS Pharmacy!ही भरती Central Council for Research in Ayurvedic Sciences (CCRAS) यांच्या प्रकल्पांतर्गत होत असून “Evaluation of Brahmi Ghrita in in-vitro and in-vivo models of Alzheimer’s disease” या संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

या पदासाठी M.Pharm (Pharmacology) / M.V.Sc (Pharmacology) / MSc (Molecular Biology, Biochemistry, Biotechnology, Microbiology) ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. प्राणी प्रयोग (Animal Experimentation) क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असून प्रकल्पाचा कालावधी 1 वर्ष आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹42,000 फेलोशिप + 9% HRA (₹3,780) म्हणजे एकूण ₹45,780 प्रति महिना मानधन दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी JSS Academy of Higher Education & Research च्या अधिकृत वेबसाइटवर career link द्वारे 12 मार्च 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेल / कॉल / WhatsApp द्वारे मुलाखतीची माहिती दिली जाईल. मुलाखतीवेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि त्याच्या स्व-साक्षांकित प्रती पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक Dr. Justin A, असोसिएट प्रोफेसर, फार्माकोलॉजी विभाग, JSS कॉलेज ऑफ फार्मसी, ऊटी आहेत.

Comments are closed.