पीएचडी प्रवेशासाठी ५ ते २० मार्च विशेष फेरी; पात्र उमेदवारांना आणखी एक संधी! | Special March Round for PhD Admissions!

Special March Round for PhD Admissions!

Savitribai Phule Pune University संलग्न विविध संशोधन केंद्रांतील पीएचडी प्रवेशाच्या रिक्त जागांसाठी ५ ते २० मार्च दरम्यान विशेष प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. पेट परीक्षा उत्तीर्ण तसेच पेटमधून सूट मिळालेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

Special March Round for PhD Admissions!

पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त जागांची माहिती विद्यापीठाच्या पीएचडी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनद्वारे संशोधन केंद्राची निवड करावी. ही निवड प्रक्रिया सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंत केंद्र निवडणे अनिवार्य आहे.

केंद्र निवड करताना तांत्रिक अडचणी आल्यास विद्यापीठाच्या आयटी सपोर्ट विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी दोन प्रवेश फेऱ्या पार पडल्या असल्या तरी काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते.

अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यासाठी ही विशेष फेरी राबवली जात असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून पात्र उमेदवारांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.