सैनिक कल्याण विभागात माजी सैनिकांमधून लिपिक आणि टंकलेखक यांची एकूण ७२ पदांची भरती होणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार इच्छुक उमेदवारांनी ५ नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

ही भरती फक्त माजी सैनिकांसाठी राखीव असून, अर्जदारांनी पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. Soldier Clerk Recruitment प्रक्रियेसाठी टीसीएस-आयओएनकडून परीक्षा व निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. पात्र उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज ५ नोव्हेंबर संध्याकाळी २३.५९ वाजता पर्यंत सादर करावा.
जिल्ह्यातील माजी सैनिकांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. अर्ज लवकर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय अर्ज पूर्ण करता येईल.

Comments are closed.