सीईटी नाही, पण इंजिनिअरिंग नक्की!-Skip CET, Still Get Engineering!

Skip CET, Still Get Engineering!

आता इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी बारावी, सीईटी, आणि त्यानंतरची गुंतागुंतीची प्रवेशप्रक्रिया झेपेनं वाटते का? मग घ्या हा “शॉर्टकट”! दहावीनंतर थेट डिप्लोमा कोर्स करून विद्यार्थ्यांना डिग्री कोर्सच्या दुसऱ्या वर्षी थेट प्रवेश मिळतोय – तोही CET शिवाय!

Skip CET, Still Get Engineering!गेल्या ३ वर्षांत या मार्गाने जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यंदा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षासाठी ५२ हजार जागांसाठी तब्बल ५८ हजार अर्ज आलेत. फार्मसीच्या बाबतीतही मोठा प्रतिसाद मिळतोय.

२०२४-२५ मध्ये एकट्या महाराष्ट्रात ५४,७१० विद्यार्थ्यांनी डिप्लोमावरून थेट डिग्रीच्या दुसऱ्या वर्षी प्रवेश घेतलाय. यातून स्पष्ट होतं की, हा ‘खुष्कीचा मार्ग’ आता लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः मुलींचा सहभागही मोठा वाढतोय – २१ हजारांहून अधिक मुलींनी अर्ज केलेत.

मुख्य मुद्दे थोडक्यात:

  • CET शिवाय डिग्रीमध्ये प्रवेश: डिप्लोमा झाल्यावर थेट दुसऱ्या वर्षी प्रवेश.

  • उच्च प्रतिसाद: ५२ हजार जागांसाठी ५८ हजार अर्ज.

  • तीव्र स्पर्धा: वर्षागणिक विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.

  • फार्मसीत ४७% तर इंजिनिअरिंगमध्ये २१% वाढ.

  • प्रवेश प्रक्रिया सोपी आणि जलद.

Comments are closed.