स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये (SIDBI) नोकरी करायची भारीच सुवर्णसंधी चालून आली आहे! सिडबीने ग्रेड १ आणि ग्रेड २ ऑफिसर पदांकरिता भरती काढली हाय. त्याची बकायदा अधिसूचना जाहीर केली गेली.
सामान्य आणि स्पेशलिस्ट, अशा दोन्ही प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. ग्रेड A आणि ग्रेड B – दोन्ही पदांसाठी मिळून एकूण ७६ जागा आहेत. त्यामुळे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी वेळ न घालवता अर्ज टाकावं.
ग्रेड A साठी पगार तब्बल ₹१,००,००० तर ग्रेड B साठी ₹१,१५,००० पर्यंत मिळणार! यामध्ये तुमच्या अनुभव आणि पात्रतेनुसार पगार ठरवला जाईल. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे. सगळी माहिती www.sidbi.in या सिडबीच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
अर्ज कसा कराल?
१. सिडबीच्या वेबसाइटवर जा.
२. “Careers” वर क्लिक करा.
३. ग्रेड A आणि B साठी अर्जाची लिंक दिसेल – त्यावर क्लिक करा.
४. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
अर्ज प्रक्रिया १४ जुलैपासून सुरू झाली आहे आणि ११ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.
निवडप्रक्रिया:
पहिली फेजची लेखी परीक्षा ६ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. दुसरी फेज ४ ऑक्टोबर २०२५ ला होऊ शकते. त्यात निवड झालेल्यांना नोव्हेंबरमध्ये इंटरव्ह्यूला बोलावण्यात येणार आहे.