शेल-एआयसीटीई वर्च्युअल इंटर्नशिप २०२५ सुरू झाली हाय! एड्युनेट फाउंडेशनच्या माध्यमातून येणारी ही “स्किल्स 4 फ्युचर” इंटर्नशिप म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सोन्याची संधी.
या सहा आठवड्यांच्या ऑनलाईन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ग्रीन टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स यांसारख्या क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
घरबसल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन, गटाने काम करण्याची संधी आणि शेल, एआयसीटीई आणि एड्युनेट यांच्या प्रमाणपत्रांसह ही इंटर्नशिप भविष्यातील करिअरसाठी मजबूत पाया घालते.
मुख्य वैशिष्ट्यं
पूर्णपणे ऑनलाईन – ६ आठवड्यांचा स्व-अध्ययनाधारित कार्यक्रम
३,००० सीट्स उपलब्ध – लवकर अर्ज करा!
अर्जाची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२५
शुल्क: शून्य (नो स्टायपेंड, पण इंडस्ट्री-मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे)
परकस: तज्ज्ञ मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, उद्योगक्षेत्रात आपली ओळख
पात्रता
सीएस, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, डेटा सायन्स अशा शाखांतील दुसऱ्या-तिसऱ्या-चौथ्या वर्षाचे विद्यार्थी
किमान वय: १७ वर्षं
लॅपटॉप व इंटरनेट अनिवार्य
अर्ज कसा कराल?
एआयसीटीई इंटर्नशिप पोर्टलवर नोंदणी करा
विद्यार्थी प्रोफाइल पूर्ण भरा
“शेल-एआयसीटीई वर्च्युअल इंटर्नशिप” शोधा आणि “Apply Now” वर क्लिक करा
अर्ज सबमिट केल्यानंतर ईमेलवर निवडीचा मेसेज पहा

Comments are closed.