विद्यार्थिनींसाठी संशोधनाची नवी ‘शक्ती’; राष्ट्रीय महिला आयोगाची ‘शक्ती स्कॉलर्स’ फेलोशिप जाहीर! | ‘Shakti Scholars’ Fellowship Open for Women!

‘Shakti Scholars’ Fellowship Open for Women!

तरुण विद्यार्थिनींमध्ये संशोधनाची आवड निर्माण करून त्यांना बळ देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने ‘शक्ती स्कॉलर्स’ या विशेष फेलोशिपची घोषणा केली आहे. धोरणनिश्चिती, शैक्षणिक व्यवस्थापन, महिलांचे हक्क व सबलीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दर्जेदार संशोधन घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

‘Shakti Scholars’ Fellowship Open for Women!

या फेलोशिपअंतर्गत लैंगिक समानता, महिला सुरक्षा व प्रतिष्ठा, कायदेशीर हक्क व न्याय, सायबर सुरक्षा, पॉश धोरणांची अंमलबजावणी, महिला नेतृत्व, राजकारणातील सहभाग, आरोग्य व पोषण, शिक्षण व कौशल्य विकास, सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण, उद्योजकता, काम-जीवन संतुलन तसेच प्रादेशिक व स्थानिक विकास अशा विविध विषयांवर संशोधन प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

२१ ते ३० वयोगटातील विद्यार्थिनींना या फेलोशिपसाठी अर्ज करता येईल. निवड झालेल्या संशोधक विद्यार्थिनींना तीन हप्त्यांत एकूण ₹१ लाखांची फेलोशिप दिली जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख ३१ डिसेंबर असून, सविस्तर अटी व अर्ज प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ही फेलोशिप महिलांच्या हक्कांना बळ देणाऱ्या संशोधनासाठी नवी दिशा देणारी ठरणार असून, नव्या पिढीतील संशोधक विद्यार्थिनींसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.

Comments are closed.