बायोटेक्नॉलॉजी, लाइफ सायन्सेस आणि मोलेक्युलर मेडिसिन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी SGPGIMSची स्टुडंट इंटर्नशिप 2025 ही उत्तम संधी आहे.

SERB निधीतून राबविल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित संशोधन प्रकल्पावर प्रत्यक्ष काम, अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन आणि रिअल रिसर्चचा अनुभव — हे सर्व या इंटर्नशिपमधून मिळणार आहे. बायोटेक, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि लाइफ सायन्सेसमधील उच्च शिक्षण वा उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ही इंटर्नशिप प्रभावी पायरी ठरणार आहे.
प्रकल्पाचा तपशील:
JE व्हायरस संसर्गानंतर ऑटोफॅजी फ्लक्स पुनर्संचयित करण्यातील नवीन हेप्सिडीन-नियंत्रक बायोलॉजिक्सची भूमिका आणि मायक्रोग्लिया/मॅक्रोफेज सक्रियतेचा अभ्यास.
फाईल क्रमांक: CRG/2023/006849
प्रमुख संशोधक: डॉ. आलोक कुमार, विभाग– मोलेक्युलर मेडिसिन आणि बायोटेक्नॉलॉजी, SGPGIMS लखनऊ.
पद: स्टुडंट इंटर्न
पात्रता: M.Sc./M.Tech किंवा समकक्ष विज्ञान शाखांतील विद्यार्थी
मानधन: ₹5000 प्रति महिना
कालावधी: 2 महिने
पदसंख्या: 1
अर्ज शुल्क: नाही
अर्ज प्रक्रिया: निर्दिष्ट फॉर्म ईमेलद्वारे PI — डॉ. आलोक कुमार (al*******@***il.com ) — यांना “SSR-SERB 2025” या विषयासह पाठवायचा आहे.
अर्जाची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2025
मुलाखतीची माहिती पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे देण्यात येईल.

Comments are closed.