सेट परीक्षा येत्या जूनमध्ये; लवकरच अधिकृत घोषणा! | SET Exam in June; Official Announcement Soon!

SET Exam in June; Official Announcement Soon!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SET विभागातर्फे आयोजित होणारी SET परीक्षा येत्या जून महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेची अधिकृत घोषणा लवकरच विद्यापीठाकडून केली जाणार असून, परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली तयारी सुरू करावी, असे विश्वासार्ह सूत्रांकडून सांगितले जाते.

SET Exam in June; Official Announcement Soon!

राज्यातील विविध विद्यापीठांच्या संलग्न महाविद्यालयांमधील सुमारे 5,000 प्राध्यापक पदे भरण्यासंदर्भात शासनाकडून हालचाली सुरू आहेत. या पदांच्या पात्रतेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी SET परीक्षा आयोजित केली जाते. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा आयोजित करण्यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता आणि SET परीक्षा घेण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच विद्यापीठाकडून परीक्षा दिनांकाची अधिकृत घोषणा होईल.

विद्यापीठाच्या SET विभागाद्वारे आतापर्यंत सुमारे 40 परीक्षा घेण्यात आल्या असून, त्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाल्या होत्या. नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात असली तरी पेपर फुटीच्या घटनेमुळे ती पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेतली गेली.

त्यामुळे SET परीक्षा सुद्धा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येण्याची शक्यता जास्त आहे. गेल्या काही वर्षांपासून SET परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत चर्चा सुरू होती; त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी आणि चाचपणी केली होती, परंतु अंतिम निर्णय ऑफलाइन पद्धतीकडे वळण्याची दाट शक्यता आहे.

Comments are closed.