निवड झाली, नेमणूक नाही!-Selected, Not Appointed!

Selected, Not Appointed!

0

राज्य सरकारनं पेसा क्षेत्रात १७ संवर्गांमधल्या हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती, पण अद्यापही हजारो उमेदवारांना नियुक्तीचं प्रतीक्षाचं वळण लागलेलं आहे. २,४८८ पात्र उमेदवारांना निकाल लागूनही नेमणूक मिळालेली नाही, तर ३,६९३ उमेदवारांचा निकाल तयार असून तो सरकारनं राखून ठेवलाय.

Selected, Not Appointed!या भरतीत तलाठी, शिक्षक, आरोग्य सेवक, वनरक्षक, ग्रामसेवक, कृषी सहायक, परिचारिका अशा विविध पदांचा समावेश होता. शासनाच्या विलंबामुळे हजारो आदिवासी उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावं लागतंय.

सचिवांची बैठक झाली, पण…
९ जुलैला राज्यभरातील सहायक आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. मागासवर्ग कक्षामार्फत आरक्षण व पदभरतीसंदर्भातला आढावा घेतला गेला.

मंत्री अशोक उईके यांचा दावा:
यवतमाळात धरती आबा अभियान कार्यक्रमात बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितलं की, एका महिन्यात १०० टक्के पदे भरली जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.