भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ने २०२५ मध्ये अधिकारी ग्रेड ‘ए’ (सहाय्यक व्यवस्थापक) पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. ही भरती विविध विभागांसाठी होणार आहे ज्यामध्ये जनरल, लीगल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च, ऑफिसियल लँग्वेज, इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) आणि इंजिनिअरिंग (सिव्हिल) यांचा समावेश आहे. एकूण ११० रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाईन सुरू होईल.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून पार पडणार आहे. उमेदवारांनी SEBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेसोबतच आवश्यक दस्तऐवज अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि ऑनलाईन लिंक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी उपलब्ध होईल.
रिक्त पदांची विभागवार माहिती
- जनरल स्ट्रीम: ५६ जागा
- लीगल स्ट्रीम: २० जागा
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी: २२ जागा
- रिसर्च: ४ जागा
- ऑफिशियल लँग्वेज: ३ जागा
- इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल): २ जागा
- इंजिनिअरिंग (सिव्हिल): ३ जागा
शैक्षणिक पात्रता
जनरल स्ट्रीमसाठी कोणत्याही शाखेतील मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (किमान दोन वर्षांचा अभ्यासक्रम) आवश्यक आहे. लीगल स्ट्रीमसाठी लॉमध्ये बॅचलर डिग्री अनिवार्य आहे आणि वकील म्हणून दोन वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल. आयटी स्ट्रीमसाठी इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर सायन्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आवश्यक आहे. रिसर्च स्ट्रीममध्ये अर्थशास्त्र, फायनान्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा क्षेत्रातील मास्टर डिग्री आवश्यक आहे. ऑफिशियल लँग्वेजसाठी हिंदी/इंग्रजीमध्ये मास्टर डिग्री आणि इंग्रजी/हिंदी बॅचलर डिग्री अनिवार्य आहे.
इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) स्ट्रीमसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आवश्यक आहे, तर इंजिनिअरिंग (सिव्हिल) स्ट्रीमसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री अनिवार्य आहे. प्रॉपर्टी मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, स्ट्रक्चरल डिझाइन यासारख्या अनुभवास प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय ३० सप्टेंबर २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आवश्यक शिथिलता नियमांनुसार लागू असेल. अंतिम परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र राहतील.
निवड प्रक्रिया
SEBI ग्रेड ‘ए’ अधिकाऱ्यांची निवड तीन टप्प्यात केली जाईल:
१. ऑनलाईन परीक्षा (दोन पेपर)
२. दुसऱ्या टप्प्यात शॉर्टलिस्टेड उमेदवारांसाठी ऑनलाईन परीक्षा (दोन पेपर)
३. वैयक्तिक मुलाखत
सेबी आवश्यकतेनुसार निवड प्रक्रियेत बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
वेतन व फायदे
निवड झालेल्या उमेदवारांचे प्रारंभी दोन वर्षांचे परिविक्षाधीन कालावधी असेल. ग्रेड ‘ए’ अधिकाऱ्यांचे वेतन ₹६२५०० ते ₹१२६१०० पर्यंत आहे. यामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), ग्रेड अलाउन्स, स्पेशल अलाउन्स, महागाई भत्ता, फॅमिली अलाउन्स, लोकल अलाउन्स, लर्निंग अलाउन्स, स्पेशल ग्रेड अलाउन्स अशा अनेक भत्त्यांचा समावेश आहे. निवासस्थानाशिवाय अंदाजे ₹१,८४,००० आणि निवासस्थानासह ₹१,४३,००० मासिक वेतन मिळू शकते.
अर्ज शुल्क
अनारक्षित, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क ₹१००० (१८% GST सहित) आहे. SC/ST/PwD उमेदवारांसाठी शुल्क ₹१०० (१८% GST सहित) आहे. अर्ज फी परत केले जाणार नाही.
महत्त्वाची लिंक
SEBI अधिकृत अधिसूचना PDF डाउनलोड करण्यासाठी: SEBI Grade A 2025 PDF
या भरतीत करियरच्या सुवर्णसंधीसह आकर्षक वेतन आणि फायदे मिळणार आहेत, त्यामुळे योग्य पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याची अत्यंत गरज आहे.