जागतिक स्तरावरील लाइफ सायन्सेस कंपनी थर्मो फिशर सायंटिफिकमध्ये सायंटिस्ट पदासाठी भरती जाहीर झाली आहे. लाइफ सायन्सेसमध्ये मास्टर्स किंवा पीएचडी केलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून बेंगळुरू येथे नियुक्ती होणार आहे.
या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना प्रोटीन बायोलॉजी आणि अँटीबॉडी संशोधन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. संशोधन, प्रयोगांची अंमलबजावणी, डेटा नोंदणी तसेच वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास करून नव्या अँटीबॉडी विकसित करण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभाग घ्यावा लागेल.
या भरतीसाठी Life Sciences मध्ये Master’s (0–4 वर्षांचा अनुभव) किंवा PhD असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना इम्युनोलॉजी, फ्लो साइटोमेट्री, ELISA, PCR, मॉलिक्युलर क्लोनिंग तसेच सेल बायोलॉजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ही नोकरी संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्ससाठी मोठी संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

Comments are closed.