१५ जूनपासून शाळा सुरू!-Schools Reopen June 15!

Schools Reopen June 15!

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. यानुसार, राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना यंदा २ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे.

Schools Reopen June 15!ही सुट्टी १४ जूनपर्यंत चालणार असून विद्यार्थ्यांना सुमारे दीड महिन्यांचा आराम मिळणार आहे.नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. मात्र, विदर्भातील वाढत्या उष्णतेचा विचार करून सुरुवातीच्या काळात शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. १५ जून ते २९ जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात, म्हणजेच सकाळी ७.०० ते ११.४५ या वेळेत भरतील.

यानंतर ३० जूनपासून सर्व शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षण सुरळीतपणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, या निर्णयामुळे राज्यभरातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये एकसारखेपणा येईल. तसेच, इतर मंडळांच्या शाळांना त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांनुसार सुट्टीबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

Comments are closed.