१५ जूनपासून शाळा सुरू! – Schools Reopen June 15!

Schools Reopen June 15!

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे उन्हाळी सुट्टीची तारीख निश्चित झाली असून, २ मेपासून अधिकृतपणे सुट्टी सुरू होणार आहे. यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Schools Reopen June 15!यंदा एक मोठा बदल करत विदर्भासाठी वेगळं वेळापत्रक ठेवण्याची पद्धत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील सर्व शाळा एकाच दिवशी म्हणजे १५ जूनला सुरू होणार आहेत.

दरवर्षी उष्णतेमुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होत असत, पण यंदा शिक्षण विभागाने एकसमान वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तापमानाचा विचार करून सुरुवातीच्या काही दिवसांत शाळांची वेळ मर्यादित ठेवण्यात आली आहे.

१५ ते २७ जूनदरम्यान विदर्भातील शाळा सकाळी ७ ते ११:४५ या वेळेतच भरतील. त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळापत्रक लागू होणार आहे.

शिक्षण संचालनालयाने २८ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, इतर मंडळांच्या शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

Comments are closed.