राज्यातील मागास बहुजन कल्याण विभाग आता विजाभज, इमाव आणि विमाप्र इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन पद्धतीने राबविणार आहे, असे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी सांगितले.
याअंतर्गत खालील योजना लागू होणार आहेत:
इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेप्रमाणे शिष्यवृत्ती.
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फी आणि परीक्षा फी भरणे.
इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती.
इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना देखील सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू.
इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या डीएनटी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती.
सर्व योजना महाडीबीटी पोर्टल (https://permatric.mahait.org/login/login) वर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत आणण्यात येत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आपल्या यूजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून शाळेचे प्रोफाइल अद्ययावत करतील.