महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता ५ वी (पूर्व-उच्च प्राथमिक) आणि इयत्ता ८ वी (पूर्व-माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठीच्या अर्ज प्रक्रियेला महत्त्वाची मुदतवाढ दिली आहे. शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर 2025 वरून वाढवून आता ८ डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

ही परीक्षा २२ फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे. सुरुवातीला शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे अर्ज २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर 2025 दरम्यान स्वीकारले जात होते. मात्र, अनेक शाळांनी प्रक्रिया पूर्ण न केल्याने परिषदेने अतिरिक्त वेळ दिला आहे.
अर्ज कधीपर्यंत करता येणार? (शुल्कानुसार वेळापत्रक)
- नियमित शुल्कासह: २७ ऑक्टोबर 2025 ते ८ डिसेंबर 2025
- विलंब शुल्कासह: ९ डिसेंबर 2025 ते १५ डिसेंबर 2025
- विशेष विलंब शुल्कासह: १६ डिसेंबर 2025 ते २३ डिसेंबर 2025
- अतिविशेष विलंब शुल्कासह: २४ डिसेंबर 2025 ते ३१ डिसेंबर 2025
३१ डिसेंबर 2025 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
कुठे करायचा अर्ज?
विद्यार्थी आणि शाळांनी अर्ज व नोंदणी प्रक्रिया खालील संकेतस्थळावर पूर्ण करावी:
www.mscepune.in
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही मुदतवाढ शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय ठरला आहे.

Comments are closed.