जळगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधक कितीही गैरसमज पसरवोत, पण तुमचा ‘देवाभाऊ’ इथे आहे तोवर ‘लाडकी बहीण योजना’ कुणाच्या बापालाही बंद करता येणार नाही.” भुसावळच्या विकासासाठी वस्त्रोद्योग आणणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
सभेच्या आधी मंत्री संजय सावकारे यांच्याशी वाद घालणाऱ्या एका तरुणाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने थोडा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या तरुणाला ताब्यात घेतले.
धुळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पवन संदानशिव यांनी “पीडित चिमुकलीला न्याय द्या, आरोपीला फाशी द्या” असा बॅनर दाखवत निषेध केला.
शिंदे यांनी सरकार याबाबत गंभीर असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले.

Comments are closed.