अनुसूचित जाती प्रशिक्षण!-SC Student Skill Training!

SC Student Skill Training!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि छत्रपती संभाजीनगर येथील इंडो-जर्मन टूल रूम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. या प्रशिक्षणात विविध क्षेत्रातील एकूण ६१ महत्त्वाच्या कौशल्यांचा समावेश आहे.

SC Student Skill Training!प्रशिक्षणासंदर्भातील संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.barti.in उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे.

पूर्णपणे निःशुल्क असलेल्या या प्रशिक्षणात हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच एआय स्किल प्रोग्रामचा समावेश आहे. बार्टीतर्फे उमेदवारांसाठी प्रशिक्षणादरम्यान राहण्याची आणि जेवणाची सोय देखील करण्यात आली आहे. पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण फक्त आयजीटीआर छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहे, तर पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि वाळूज या उपकेंद्रांमध्ये अनिवासी प्रशिक्षणाची सोय आहे.

उमेदवार पात्रता: अनुसूचित जातीतील १८ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थी. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे.

ज्या प्रशिक्षण केंद्रात अर्ज केला जाईल, तेथेच पात्रता परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह स्वतःच्या खर्चाने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे लागेल.

विद्यार्थ्यांनी जाहिरातीत दिलेल्या क्यूआर कोड किंवा लिंक वापरून आयजीटीआरच्या संकेतस्थळावरून अर्ज करावा. पात्रता परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीची तारीख १५ ऑक्टोबर २०२५ जाहीर करण्यात आली आहे.

बार्टीतर्फे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.