सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी! भारतीय स्टेट बँकेने (SBI) स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत एकूण १२२ पदे भरण्यात येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही, निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. निवडीसाठी १०० गुणांची मुलाखत घेतली जाईल आणि त्याच कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड ठरवली जाईल.
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक.
बॅलन्स शीट समजणे, अप्रेझल तयार करणे, क्रेडिट प्रस्ताव मूल्यांकन, क्रेडिट मॉनिटरिंग यातील अनुभव असणे आवश्यक.
वय: किमान २५ वर्षे, कमाल ३५ वर्षे. आरक्षित प्रवर्गासाठी सूट – SC/ST: ५ वर्षे, OBC: ३ वर्षे, दिव्यांग: १० वर्षे.
अर्ज शुल्क:
सामान्य, OBC, EWS: ₹७५०
SC, ST, दिव्यांग: शुल्क माफ

Comments are closed.