भारतीय स्टेट बँकेने त्यांच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदवार्ता दिली आहे. ‘एसबीआय प्लॅटिनम जुबिली आशा शिष्यवृत्ती २०२५’ या योजनेअंतर्गत देशभरातील तब्बल २३ हजारांहून अधिक होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे.
या शिष्यवृत्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे –
अर्जदाराला २० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते.
अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२५ आहे.
इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी, एनआयआरएफ टॉप ३०० / एनएएसी ‘ए’ ग्रेड कॉलेजमधील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, आयआयटी-आयआयएम स्कॉलर्स, वैद्यकीय विद्यार्थी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे एससी/एसटी विद्यार्थी अर्ज करू शकतात.
पात्रतेचे निकष :
भारतीय नागरिक असणे आवश्यक
मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५% गुण किंवा ७.० सीजीपीए
उत्पन्न मर्यादा :
शालेय विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ₹३ लाखांपर्यंत
कॉलेज विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ₹६ लाखांपर्यंत
‘एसबीआय फाउंडेशन’ने यासाठी ९० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. अधिक माहिती आणि अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ : www.sbiashascholarship.co.in

Comments are closed.