जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये भरतीची सुवर्णसंधी आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय थेट निवड केली जाणार असून, २७३ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी २६ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करावा.
पद आणि पात्रता:
- FLC काउंसलर्स – २६३ पदे (सेवानिवृत्त अधिकारी पात्र)
- FLC डायरेक्टर्स – ६ पदे
- मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट्स) – ४ पदे (MBA/PGDM आवश्यक)
पगार:
- मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट्स) – ₹1,05,280/-
- FLC काउंसलर्स – ₹50,000/-
- FLC डायरेक्टर्स – ₹75,000/-
अर्ज कसा करावा?
- sbi.co.in वर जा आणि रजिस्ट्रेशन करा.
- लॉगिन करून अर्ज भरा.
- फी भरून फॉर्म सबमिट करा.
- प्रिंट काढून ठेवा.
शेवटची तारीख: २६ मार्च २०२५
सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!