बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून 900 हून अधिक रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी SBI कडून बहुस्तरीय निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्रतेच्या आधारे स्क्रीनिंग, त्यानंतर मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी असे टप्पे असतील. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती दिली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी करावी. नोंदणीनंतर अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरून सबमिट करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर तो डाउनलोड करून भविष्यासाठी त्याचा प्रिंटआउट जतन करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या भरतीसाठी सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ₹750 अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि PwD उमेदवारांना अर्ज शुल्कात पूर्ण सूट देण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा, तसेच भरती प्रक्रियेतील पुढील अपडेटसाठी SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.