आता बँकेत नोकरी मिळवायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून क्लर्क पदासाठी तब्बल ६५८९ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ५१८० नियमित तर १४०९ बॅकलॉग पदांचा समावेश आहे.
ही भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रिलिम्स परीक्षा २०, २१ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होणार आहे.
परीक्षा पॅटर्न:
एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न
वेळ: १ तास
इंग्रजी – ३० प्रश्न
संख्यात्मक क्षमता – ३५ प्रश्न
तर्कशक्ती क्षमता – ३५ प्रश्न
निगेटिव्ह मार्किंग: चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण कपात
प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेल्यांना मुख्य परीक्षा व भाषा चाचणीची संधी मिळणार असून, अंतिम निवड कामगिरीनुसार केली जाणार आहे. बँकेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी म्हणजे खरंच सुवर्णअवसर!

Comments are closed.