सौदी अरेबियाने मोठी रोजगार मोहीम जाहीर करत ३१ हजार नवीन अर्धवेळ पदांची घोषणा केली आहे. इस्लामिक व्यवहार, दावा आणि मार्गदर्शन मंत्रालयाने देशभरातील मशिदींमध्ये इमाम व मौज्जिन या महत्वाच्या पदांसाठी ही मोठ्या प्रमाणावर भरती सुरू केली आहे.
यामागचा उद्देश म्हणजे मशिदींमधील सेवांचा दर्जा उंचावणे आणि पात्र सौदी नागरिकांना अधिक संधी उपलब्ध करून देणे.
या नोकऱ्या ‘रिवॉर्ड्स सिस्टीम’ (Makafaat) अंतर्गत दिल्या जाणार असून, पूर्णवेळ काम करण्याची सक्ती नाही. त्यामुळे इच्छुक नागरिक मुख्य नोकरी सांभाळूनही उर्वरित वेळेत मशिदींमध्ये सेवा देऊ शकतील, अशी लवचिकता ठेवण्यात आली आहे.
३१ हजार नव्या पदांसह मंत्रालयाने एकूण ९१ हजार जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. अर्जदार सौदी नागरिक असणे, किमान १८ वर्षे वय असणे आणि चारित्र्य स्वच्छ असणे आवश्यक आहे. इमाम पदासाठी कुराण पठण आणि मूलभूत इस्लामिक ज्ञान असणे बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाइन नाही; इच्छुकांनी संबंधित प्रादेशिक कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करावा लागणार आहे.

Comments are closed.