कन्नड तालुक्यातल्या १३८ ग्रामपंचायतींना सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन मंजूर झालंय. यासाठी तब्बल १८ लाखांचा निधी पंचायत समितीकडं आला आहे. जुलै २०२४ पर्यंत थेट खात्यावर मानधन यायचं, पण आता तो निधी आधी पंचायत समितीकडं येतो आणि मग वाटप होतं. त्यामुळे ऑगस्टपासूनचं मानधन मिळणार आहे.
सरकारनं लोकसंख्येच्या आधारावर वेगवेगळं मानधन ठरवलंय —
- २ हजार पर्यंतच्या गावांसाठी सरपंचांना ₹2250 आणि उपसरपंचांना ₹750
- २ ते ८ हजार लोकसंख्या – सरपंचांना ₹3000, उपसरपंचांना ₹1125
- ८ हजारांवर – सरपंच ₹3750, उपसरपंच ₹1500
मात्र, २६ गावांचे सरपंच-उपसरपंच म्हणतात की, “आधी थेट खात्यावर पैसे यायचे, आता काहीच मिळत नाही.” काहींनी २०२१ पासून मानधनच मिळालं नसल्याचा आरोप केलाय.
गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे म्हणाले:
“२६ गावांकडून तक्रारी आल्या आहेत. वरिष्ठांना कळवलंय. निधी मिळताच पैसे वितरित करू.”
सरपंचांचा आक्रोश:
“कधी दोन वेळा, कधी तीन वेळा मिळालं. उरलेलं मानधन अजूनही थकीत आहे. आमच्या कामाचं योग्य मोबदला मिळावा हीच अपेक्षा आहे!”