मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेत लवकरच बहुचर्चित भरती प्रक्रियेला सुरुवात! | Big News! Sambhajinagar District Bank Recruitment Soon!

Big News! Sambhajinagar District Bank Recruitment Soon!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच चर्चेत असलेली मोठी नोकरभरती होणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सहकार आयुक्त कार्यालयाने लिपिक श्रेणीतील ९४ पदे भरतीस मंजुरी दिली आहे.

Big News! Sambhajinagar District Bank Recruitment Soon!

याशिवाय, आणखी २८६ पदांसाठीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावास मंजुरी मिळताच, भरती प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे पाटील यांनी दिली.

बँकेचा व्यवहार नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार कोअर बँकिंग प्रणालीत आणण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३७ शाखा आणि मुख्य कार्यालय संगणकीकृत पद्धतीने कार्यरत आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस अलर्ट तसेच ऑनलाइन खाते पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत डीबीटीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा करण्याची सोय या बँकेकडून दिली जाते. त्यामुळे ही बँक “शेतकऱ्यांची बँक” म्हणून ओळखली जाते.

गेल्या काही वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या घटल्याने नोकरभरतीची गरज तीव्र झाली आहे. यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियांना वादाचा रंग लागल्याने यंदा भरती पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Comments are closed.