केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीचा आनंद!

Salary Hike Delight!

केंद्र सरकारच्या नोकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जुलै 2025 मध्ये महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या 55 टक्के असलेला DA, आता 59 टक्क्यांवर पोहचू शकतो. ह्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे.

Salary Hike Delight!DA दरवर्षी जानेवारी आणि जुलैपासून लागू होतो, पण घोषणा मात्र फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते. हा भत्ता CPI-IW (औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई निर्देशांक) वर आधारित असतो.

DA ठरवण्यासाठी मागील 12 महिन्यांचा CPI-IW सरासरी घेतली जाते आणि खालील सूत्र वापरलं जातं:
DA (%) = [(CPI-IW सरासरी – 261.42) ÷ 261.42] × 100
2016 हे आधार वर्ष म्हणून घेतलं जातं.

मे 2025 चे काही आकडे आले असून, CPI-AL आणि CPI-RL मध्ये थोडी घट दिसते. ह्याचा थेट DA वर परिणाम नसला, तरी महागाईच्या ट्रेण्डचं भाकीत करायला उपयोग होतो. त्यामुळे DA वाढ 3 ते 4 टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

उदाहरण द्यायचं झालं, तर ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 आहे, त्याला सध्या 55% DA म्हणजे 9,900 रु. मिळतो. 4% वाढीनंतर हे 10,620 होईल, म्हणजे 720 रुपयांची वाढ.

जून 2025 चा CPI डेटा जुलैच्या शेवटी येईल. त्यानंतर केंद्र सरकार सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान अधिकृत घोषणा करेल आणि नव्या दरांचा अंमल जुलैपासून होईल – एरिअर्ससहित.

8वा वेतन आयोग लवकरच येण्याची शक्यता आहे, पण तोपर्यंत 7व्या आयोगाखाली आणखी एक DA वाढ मिळणार, असं वाटतंय.

Comments are closed.